आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून अनेक जण वेगवेगले उपाय करतात. मात्र अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात ज्याला वांग असे म्हणतात. हे काळे डाग सूर्याची अतिनील किरणे, विविध प्रकारची औषधे, ऍलर्जी अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतात.
वांगचे प्रकार:
वांग चे डाग चेहऱ्यावर जिथे दिसतात त्याप्रमाणे वांग च्या डागांचं वर्गीकरण केलेलं आहे.
- सेंट्रोफेशीअल: यात कपाळावर, गालांवर, नाकावर व वरच्या ओठांवर डाग निर्माण होतात.
- माक्सीलरी: यात फक्त गालांवर डाग निर्माण होतात.
- मांडीब्यूलर: ज्यात फक्त जबड्यावर वर डाग निर्माण होतात.
- कानांच्या समोर जो गालाचा भाग आहे तिथे डाग निर्माण होऊ शकतात
वांग येन्याची कारणे:
वांग ला वैद्यकीय भाषेत मेलास्मा (Melasma) किंवा क्लोआस्मा (Chloasma) असं नाव आहे. याला दुसरं नाव आहे मास्क ऑफ प्रेग्ननसी (Mask of Pregnancy). नावावरून लक्षात आलंच असेल की सर्वसाधारण वांग चे काळे डाग पहिल्यांदा गर्भवती स्त्रियांमध्ये दिसतात. पण हल्ली वांग हा प्रकार एका विशिष्ट वयात सीमित किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये सीमित नाही राहिला. शिवाय गरोदर स्त्रियांमध्ये हा त्रास होतो म्हंटल्यावर असं वाटतं की हा आजार स्त्रियांमध्येच दिसतो. पण तसं नसून हा आजार पुरुषांमध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे जर वयोगट बघितलं तर हा आजार २५ ते ६० पर्यंत कोणत्या ही वयात, स्त्रियांना व पुरुषांना दोघांना ही होऊ शकतो. मात्र स्त्रियांमध्ये हा आजार जास्ती प्रमाणात आढळतो
वांगची लक्षणे:
वांग चे डाग चेहऱ्यावर विविध कारणांमुळे दिसतात. एक तर संप्रेरकांच्या प्रभावामुळे. म्हणूनच गरोदरपणात जिथे संप्रेरक कमी जास्त होत असतात अशा अवस्थेत हे डाग उमटू शकतात. परंतु ज्या बायका गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात त्यांच्यात ही अनेकदा हे डाग चेहऱ्यावर दिसू लागतात. पण हल्ली हे डाग पुरुषांमध्ये ही दिसू लागले आहेत. कामानिम्मित पुरुषांना उन्हात जास्त फिरावं लागतं. म्हणून उन्हाच्या अतिनील किरणांच्या प्रभावुळे, त्वचेतील रंगपेशी त्वचेच्या संरक्षणासाठी रंग निर्माण करायला लागतात हि वांग येण्याची लक्षणे आहेत.
वांग येण्या पासून घ्यावयाची काळजी:
- त्वचारोग विशेषतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे आणि मलमचा वापर केल्यास हे डाग कमी होतात.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून फार्मासिस्टकडून घेऊन मलमचा वापर करू नये. अशा रीतीने स्टिरॉईडयुक्त मलमचा वापर केल्यास त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता अधिक असते.
- डागांसाठी टी ट्रेल ऑइल, कोजीक अॅसिडयुक्त मलमचा वापर केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.
- केमिकल पील आणि मायक्रोड्रम अब्रेशॅन या प्रक्रियांनी डाग फिकट होण्याची शक्यता असते.
- वांग कमी करण्यासाठी आता इंजेक्शनच्या रूपात नवीन उपचार उपलब्ध आहेत.
- मलमच्या वापराने सुधारणा होत नसल्यास क्यू स्विच एनडी यॅग या लेसर पद्धतीचा वापर करून डाग घालवणे शक्य आहे.
- उपचारांनंतर सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक असते. असे न केल्यास डाग पुन्हा काळे होण्याची शक्यता असते.

Pingback: मुळव्याधाचे हे प्रकार आपल्याला माहित आहेत का? - आरोग्याचे मंदिर